breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

गोखलेनगरमध्ये महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यु

पिंपरीत नवीन रुग्ण आढळला; २९ पॉझिटिव्ह रुग्ण
पिंपरी –  गोखलेनगर येथील ६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूच्या आजाराने मृत्यु झाला आहे. ‘वायसीएम’ रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यु झाला. तर शहरात पुन्हा एक नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. स्वाईन फ्लूने मृत्यु होणार्‍यांची संख्या ४ वर पोचली असून २९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शहरात वातावरणामुळे होणार्‍या बदलामुळे स्वाईन फ्लूची वाढ होताना दिसत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला हा आजार रोखण्यात अपयश येताना दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात या महिन्यात स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यु झाला आहे. योग्य व वेळेत उपचार न झाल्यामुळे रुग्णांच्या मृत्यु होण्याची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (दि. २४) गोखलेनगर, पुणे येथील ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाल्यामुळे संबंधीत रुग्ण महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २० ऑगस्ट रोजी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिकचा त्रास होऊ लागल्यामुळे त्याच दिवशी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. २१ ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लू असल्याचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. दरम्यान उपचार सुरू असताना संबंधीत महिलेचा मृत्यु झाला.
शहरात स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांची व मृत्यु होणार्‍या रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. २४) स्वाईन फ्लूचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९ वर पोचली आहे. या दिवशी २६१ सर्दी, तापाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २९ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. अद्यापपर्यंत ३ हजार ८३३ संशयितांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. १०६ जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. अद्यापपर्यंत ७ जणांनी व्हेंटिलेटवर उपचार घेतले आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button