breaking-newsराष्ट्रिय

गुजरातमध्ये दर वर्षी सरासरी 9200 महिलांची अँब्युलन्समध्ये प्रसूती

अहमदाबाद (गुजरात) – गुजरातमध्ये दर वर्षी सरासरी 9200 महिलांची अँब्युलन्समध्ये प्रसूती होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुजरात मॉडेल आणि विकसित राज्य म्हणून चर्चेत असलेल्या गुजरातमध्ये अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, खराब रस्ते आणि ट्रॅफिक जॅम या गोष्टीला जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.

चालू वर्षाच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यातच 48 महिलांची प्रसूती हॉस्पिटलला जात असताना वाटेतच झालेली आहे. इमर्जन्सी सेवा 108 च्या आकडेवारीनुसार 2015-16 ते 20118-19 च्या एप्रिल महिन्यापर्यंतच्या काळात दाहोद जिल्ह्यात सर्वाधिक 1856 महिलांची प्रसूती वाटेत अँब्यूलन्समध्ये झाली. याच काळात कच्छमध्ये1711, अमरालीमध्ये 1495 आणि नर्मदा जिल्ह्यात 1414 महिलांची प्रसूती हॉस्पिटलला जाताना वाटेतच झाल्याची नोंद आहे.

अहमदाबाद जिल्ह्यात सन 2015-16 मध्ये 570, 2016-17 मध्ये 431, सन 2017-18 मध्ये 399 आणि सन 2018 च्या एप्रिल-मे महिन्यात 54 महिलांची प्रसूती वाटेतच झाल्याची नोंद आहे. जाफराबादच्या लुणासपूर गावात प्रसूतीसाठी अँब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणाऱ्या एका महिलेची गाडी वाटेत 12 सिंहांनी अर्धा तास अडवून धरल्यामुले तिची प्रसूती अँब्युलन्समध्येच झाल्याची नोंद आहे. अँब्युलन्सच्या समोरच या सिंहानी बैठक मारल्याचे अँब्युलन्स पुढे जाऊ शकली नव्हती.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button