breaking-newsराष्ट्रिय

गुगलच्या मते…पिनरायी विजयन भारतातले सर्वात वाईट मुख्यमंत्री

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्यासाठी सध्याचा काळ हा निश्चितच चांगला काळ राहिलेला नाही. कारण राज्यात शबरीमला मंदिरात महिला प्रवेशावरुन त्यांना बऱ्याच काळापासून हिंदुत्ववादी संघटनांचा समाना करावा लागत आहे. त्यानंतर ते पुन्हा एकदा नव्या संकटात सापडले आहेत. हे संकट विरोधकांमुळे आलेले नाही तर इंटरनेटमुळे आले आहे. कारण, गुगलने आपल्या सर्च इंजिनवर विजयन यांना देशातील सर्वांत वाईट मुख्यमंत्री म्हणून संबोधले आहे.

एखाद्याने गुगलवर वाईट मुख्यमंत्री असं सर्च केल्यास गुगल त्याला थेट विजयन यांच्या विकिपिडीयाच्या पेजवर घेऊन जातोय. सोमवारी, गुगलवर २०,००० पेक्षा जास्त वेळा ‘बॅड चिफ मिनिस्टर’ या किवर्ड्सने सर्च करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक वेळी पिनरायी यांचे विकी पेज ओपन होत होते.

दरम्यान, यामागे विरोधकांचेचा कारस्थान असल्याचा वास पिनरायी यांच्या समर्थकांना येत आहे. राज्यातील शबरीमला प्रकरणात विजयन यांची प्रतिमा राज्यासाठी तितकी चांगली राहिलेली नाही. या प्रकरणात विजयन यांनी आपले सरकार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करणार असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे.

नुकतेच शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश करीत भगवान अय्यप्पांचे दर्शन घेत वर्षानुवर्षे सुरु असलेली परंपरा मोडित काढली होती. मात्र, त्यानंतर केरळमध्ये पुन्हा मोठा हिंसाचार सुरु झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी ५५०० जणांना ताब्यात घेतले आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे मुख्यमंत्री विजयन यांच्या प्रतिमेवर त्याचा विपरित परिणाम होत आहे.

नुकतेच, गुगल सर्चने अशाच प्रकारे आणखी एक वाद ओढवून घेतला होता. तो म्हणजे ‘इडियट’ हा शब्द सर्च केल्यानंतर थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पेज ओपन होत होते. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी ‘टॉप १० क्रिमिनल्स’ असे सर्च केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव गुगलने सर्चमध्ये दाखवले होते. विशेष म्हणजे मोदींच्या छायाचित्रासोबत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि लिबियाचा हुकूमशहा गद्दाफी यांचे छायाचित्र समोर येत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button