breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गाडी घेऊन देण्याच्या नावाखाली महिलेची आर्थिक फसवणूक

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गाडी घेऊन देण्याचे आमिष दाखवून शासकीय कागदपत्र आणि 28 हजार रुपये घेऊन एकाने महिलेला गंडा घातला आहे. याप्रकरणी महिलेच्या भावाने पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 15) मध्यरात्री उघडकीस आला आहे.

याप्रकरणी महेंद्र सुरेश जैसवाल (रा, राजीव गांधी शाळेशेजारी पांढ-या रंगाची बिल्डींग, रुम नं. 03, नेहरूनगर, पिंपरी) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा भाऊ अभिषेक सुभाष पाटील (वय 21, रा. शिक्षण वरधस्व हॉस्टेल, वारंगवाडी रोड, डी. वाय. पाटील कॉलेज, अंबेगाव, तळेगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक यांची बहिण शितल यांना गाडी घेऊन देण्यासाठी जैसवालने त्यांचे घरभाडे अग्रीमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी कागदपत्रे मागून घेतली. गाडी घेऊन न देता त्यांची 28 हजार 600 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button