breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गतवर्षीच्या गणेशोत्सवातील मंडळाना बक्षीस वितरण कधी?

सत्ताधारी भाजपला विरोधी पक्षनेत्यांचा सवाल  

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  शहरात सामाजिक, सांस्कृतिक चळवळ वाढावी, सामाजिक सलोखा निर्माण होवून पर्यावरण, स्वच्छतेवर जनजागृती व्हावी. याकरिता गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळाच्या विधायक प्रबोधनात्मक देखाव्यांना पालिकेकडून गाैरविण्यात येते. परंतू, गतवर्षी उत्कृष्ट ठरलेल्या मंडळांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र बक्षीस अद्याप दिलेले नाही. त्याचा सत्ताधारी भाजपला विसर पडल्याची टिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.

साने म्हणाले की,  यंदाही गणेशोत्सव सुरु होऊनही महापालिकेचा बक्षीस समारंभ झालेला नाही.  अनेक वर्षे ही परंपरा कायम राखली आहे. मात्र, यावर्षी गणेशाची स्थापना होवून बक्षीस वितरण समारंभ घेतलेला नाही, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे शहरातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली  आहे. पालिका व पोलिस प्रशासन यांच्या मार्फत भोसरी येथील शांतता बैठकीमध्ये गणेश मडळाच्या पदाधिका-यांनी याबाबत विचारणा केली होती.

दरम्यान, सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय आणि शासन अध्यादेशामुळे महापालिकेस सण-समारंभ, उत्सवावर खर्च करता येणार नाही, त्यामुळे बक्षीस वितरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत भाजपच्या भूमिकेचा राष्ट्रवादीकडून आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच यंदा  गणेश मंडळ देखावा स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यास असमर्थ असल्यास तसे जाहीर करावे, अन्यथा शहरातील गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांसह मनपाच्या आवारात ढोल, ताशासह  तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button