breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गणेशोत्सव पर्यावरण पुरक करा – महापाैर राहूल जाधव

पिंपरी ( महा ई न्यूज ) – यंदाचा गणेशोत्सव हा सर्वांना एकत्र घेऊन पर्यावरण पूरक करावा, तसेच गणेशोत्सवात समाजप्रबोधनपर चांगला संदेश जाईल असे देखावे तयार करावेत, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव यंदाही पर्यावरणपूरक, शांततेत साजरा करण्यात येणार आहे. सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांसमवेत आज (बुधवार) दुपारी ३ बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंती ते बोलत होते.  यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसेवक नामदेव ढाके, स्विकृत सदस्य अॅड.मोरेश्वर शेडगे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

महापौर राहूल जाधव म्हणाले की, गणेश विर्सजन नदीमध्ये करतात, तर काही जन हौदामध्ये करतात.काहींनी हौदांची संख्या वाढविण्याची मागणी आहे. यासाठी शांतता कमिटीची पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. तसेच पालिकेच्या माध्यमातून आवश्यक तेवढया सेवा-सुविधा गणेशोत्सवात पुरविल्या जातील. असेही ते म्हणाले. पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, सर्वांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन विसर्जनस्थळी सुरक्षारक्षक वाढविणेत येतील. गणेशोत्सवात शांतता नांदली पाहिजे, पर्यावरणाची देखील हानी होता कामा नये, विसर्जनानंतर चांगल्या कामकाज करणा-या संस्थानां, मंडळांना गौरविण्यात येईल.असे त्यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले की, गणेशोत्सवासाठी रासयनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगानी बनविलेल्या शाडू मातीच्या किंवा कागदी लगद्यापासून बनविलेल्या मुर्तींना प्राधान्य द्यावे. महोत्सवादरम्यान गुलाल अथवा अन्य रंगाचा वापर मिरवणूकात करू नये. गणेशमुर्ती शक्यतो लहान आकाराची ठेवावी. प्लास्टीक व थर्माकोलचा वापर करू नये. विद्युत रोषणाई व ध्वनीक्षेपणाचा वापर मर्यादित ठेवावा. निर्माल्य व पूजा साहित्य नदी पात्रत न टाकता निर्माल्य कुंडातच टाकावे, नदीचे पाणी प्रदुषित न करणे बाबत सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपस्थित असलेल्या विविध स्वयंसेवी सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधिंनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत सूचना मांडल्या. सूत्रसंचालन प्रभारी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर आभार नामेदव ढाके यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button