breaking-newsपुणेमहाराष्ट्र

गणेशोत्सवानिमित्त 132 जादा रेल्वे

  •  उद्यापासून करता येणार आरक्षण

पुणे – गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी आणि ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त एकूण 132 विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई-सावंतवाडी रोड, मुंबई-रत्नागिरी-पनवेल, पनवेल-सावंतवाडी रोड-मुंबई, एलटीटी-रत्नागिरी डबल डेकर, एलटीटी-पेर्णेम आदी गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांच्या आरक्षणास शनिवारपासून (दि.30) सुरूवात करण्यात आहे.
——————
1. पुणे-सावंतवाडी रोड
पुणे ते सावंतवाडी रोड दरम्यान 01431 व 01447 विशेष रेल्वे दि. 7, 10 व 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पुण्यातून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 वाजता सावंतवाडी रोड येथ पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात 01432 ही विशेष रेल्वे 13 सप्टेंबरला सावंतवाडी रोड येथून सकाळी 10 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 11.35 वाजता पुण्यात दाखल होईल.
– येथे असेल थांबा : या विशेष रेल्वेला लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधूदुर्ग, कुडाळ येथे थांबा देण्यात आला आहे.
————————
2. सावंतवाडी रोड-पनवेल
सावंतवाडी रोड-पनवेल विशेष रेल्वे क्र. 01448 ही दि. 8 व 15 सप्टेंबर रोजी सावंतवाडी रोड येथून सकाळी 10 वाजता सुटून पनवेल येथे त्याच दिवशी रात्री 8.15 वाजता पोहोचेल.
—————-
3. पनवेल-रत्नागिरी
विशेष रेल्वे क्र. 01449 दि. 8 व 15 सप्टेंबर रोजी पनवेल येथून रात्री 10.45 वाजता सुटून रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता पोहोचेल.
—————-
4. रत्नागिरी-पुणे
परतीच्या प्रवासात 01450 विशेष रेल्वे 9 व 16 सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून दुपारी 1 वाजता सुटून पुण्यात त्याच दिवशी रात्री 11.35 वाजता पोहोचेल.
———–
येथे असेल थांबा : संगमेश्‍वर रोड, अरवली रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, लोणावळा येथे थांबा देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button