breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गणराया भाजप सत्ताधा-यांना सदबुध्दी दे, राष्ट्रवादीच्या कारभा-याचे बाप्पांना साकडे

  • अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती
  • पवार यांच्या येण्याने कार्यकर्त्यांना मिळाले चैतन्य

पिंपरी – उद्योगनगरीचे तत्कालीन कारभारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक  कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बुध्दीची देवता गणरायांच्या आरतीसाठी आजचा दिवस पिंपरीत घालवला. दिवसभरात पवार यांनी अनेक मंडळांना भेटी देऊन गणरायांचे दर्शन घेतले. डिझेल, पेट्रोलचे वाढते दर आणि एकूणच महागाईचा परिनाम सार्वजनिक जीवनावर पडल्याने सत्ताधारी भाजप सरकारला सदबुध्दी येण्यासाठी पवार यांनी बाप्पांना साकडे देखील घातले. पवार यांच्या शहरात येण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नवचैतन्य प्राप्त झाले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोमाने कामाला लागा, अशा सूचना देखील पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

 

निगडीतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता पवळे यांच्या जय बजरंग तरुण मंडळाच्या गणरायांची आरती अजित पवार यांच्या हस्ते आज शनिवारी (दि. 22) झाली. यावेळी पवार यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुष्कील झाले आहे. त्यांच्यावरील हे संकट दूर करण्यासाठी राज्यकर्त्यांना सदबुध्दी दे, असे साकडे पवार यांनी बुध्दीची देवता गणरायांना घातले. तसेच, महापालिकेने गेल्या दोन-तीन पंचवार्षिकीत अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविले आहे. परंतु, अलिकडच्या काळात पर्यावरणाचा –हास होत चालला आहे. प्रदुषण वाढले आहे. रोगराई पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गणराया सर्वांना निरोगी आरोग्य दे, असेही मागणे पवार यांनी बाप्पांकडे केले आहे.

 

महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या अभिमन्यु फ्रेंड्स सर्कल या मंडळाच्या गणरायांची आरती देखील पवार यांनी केली. दत्ता साने यांनी आवरजून दादांना बोलावले होते. दादांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांचा ताफा होता. शहरातले अनेक प्रश्न दादांच्या कानावर पडत होते. सत्ताधा-यांकडून होणारा अन्याय, अफवांचा प्रचार, फेक न्यूज, दुस-यांच्या नावे दिली जाणारी निवेदने, आंदोलनकर्त्यांवर दाखल होणारे खोटे गुन्हे, महापालिकेत चाललेला अंदाधूंद कारभार आदी प्रश्न कार्यकर्त्यांनी पवार यांच्यासमोर मांडले. या प्रश्नांचं काय करायचं ते पुढे बघू. आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पक्षवाढीसाठी कसोशिने कामाला लागा, अशा सूचना पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button