breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

गडचिरोलीच काय, घरी पण जाईन ; डीवायएसपीं सुरज गुरवचे मुश्रीफांना आव्हान !

कोल्हापूर  –  कोल्हापूर महापाैर निवडीमुळे महापालिकेसमोर पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. यावेळी नगरसेवक मतदानासाठी आल्यानंतर त्यांची गेटवर आेळखपत्र तपासणी पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव करीत होते. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी हरकत घेतली आहे. 

याप्रसंगी चिडलेल्या मुश्रीफांनी डीवायएसपी गुरव यांना गडचिरोलीची हवा दाखवण्याचा इशारा दिला. मात्र, या धमकीला न घाबरता गुरव यांनी, ‘ साहेब आम्ही नोकरी करतो, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, गडचिरोलीच काय पण घरी जाईन, मात्र तुम्हाला आत सोडणार नाही,’ अशा शब्दात प्रतिआव्हान दिले. त्यामुळे महापालिकेच्या बाहेरचे वातावरणही चांगलेच तापले.

कोल्हापूर महापौर पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. निवडणुकीपूर्वीच या निवडीनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, अशी शक्‍यता दोन्ही बाजुंनी वर्तवण्यात आली होती. त्यामुळे महापालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेच्या मुख्य प्रवेशदवारावरच पोलीस अधिक्षक सुरज गुरव थांबून होते. येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे आयकार्ड बघून ते आत सोडत होते. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांना घेवून आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील महापालिका गेटवर आले. यावेळी गुरव यांनी नगरसेवकांना आयकार्ड दाखवण्याची सुचना केली.

आयकार्ड पाहण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे, तुम्हाला आयकार्ड पाहण्याचा अधिकार कोणी दिला, अशी विचारणा आमदार मुश्रीफ व आमदार पाटील यांनी डीवायएसी गुरव यांना केली. आपणाकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. आपण ते काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आमदार मुश्रीफ चांगलेच भडकले. त्यातून त्यांची गुरव यांच्याशी जोरदार वादावादी झाली. यावेळी आमदार मुश्रीफ यांनी गुरव यांना गडचिरोली दाखवण्याचा इशारा दिला. त्यामुळे गुरव ही चांगलेच भडकले. साहेब आम्ही नोकरी करतो, राजकारण नाही. गडचिरोलीच काय, घरीही जाईन, पण वर्दीवर यायचं नाही. आता तुम्ही निघायचं, अशा शब्दात त्यांनी आमदारांना सुनावले. त्यामुळे महापालिकेबाहेरचे वातावरण चांगलेच तापले. डीवायएसपी गुरव यांना पोलीस अधिकारी शांत करत होते. मात्र गुरव हे वारंवार मुश्रीफांकडे धावत होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button