breaking-newsमनोरंजन

“गजनी’चा रिमेक घेऊन आमिर येतो आहे

आमिर ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर बॉक्‍स ऑफीसवर दमदार वापसी करू इच्छित आहे. प्रेक्षकांना आमिरच्या’ठग्स ऑफ हिंदोस्तान’फार अपेक्षा होत्या. पण बॉक्‍स ऑफीसवर हा चित्रपट दणक्‍यात आपटला. बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्‍शनिस्ट’ ने या चित्रपटाच्या अपयशाचीही जबाबदारी स्विकारल्यानंतर तो आता आपल्या आगामी चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. आमिर आता “गजनी’ या सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकसाठी तयारी करत आहे.

2008 साली प्रदर्शित झालेल्या ‘गजनी’ मध्ये आमिरने शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेल्या उद्योजकाचा रोल साकारला होता. बॉक्‍स ऑफिसवर ‘गजनी’ने 114 कोटींचा गल्ला जमवला होता. 100 कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट होता. “गजनी’प्रमाणेच ‘गजनी’च्या सिक्वलच्या दृष्टीने आमिरने फिटनेसची जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘गजनी 2’ हे शीर्षकसुद्धा चित्रपटाच्या निर्मात्यांनी नोंदविले आहे. या शीर्षकाची नोंदणी हिंदी आणि तेलुगू भाषेसाठी करण्यात आली आहे. आमिरने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आगामी चित्रपटासाठी फिटनेसच्या दृष्टीने तयारी करत असल्याचे म्हटले होते. पण कोणता हा चित्रपट आहे हे मात्र त्याने स्पष्ट केले नव्हते. ते आता स्पष्ट झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button