breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खासदार मोहिते-पाटलांना विरोध नाही, पण प्रलंबित प्रश्न सोडविण्यास उमेदवारी मला द्यावी

पंढरपूर –  राष्ट्रवादीचे माढा लोकसभेचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अन्य इच्छुकांच्या उमेदवारी माझा विरोध नसल्याचे सांगत माढा लोकसभा मतदार संघातील शिक्षण, रोजगार आणि पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मी माढ्यातून इच्छुक आहे, असे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमूख यांनी आज पंढरपुरात सांगितले. त्यामुळे माढा लोकसभेसाठी इच्छुकांमुळे उमेदवारीचा तिढा वाढू लागला आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीचे ढोल नगारे वाजू लागले आहे. सर्वच पक्षातील इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूकीसाठी मतदार संघातील नेते- कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेवू लागले आहेत.  मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीत माढ्यातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकरांसह प्रभाकर देशमुख यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. उमेदवारीच्या मागणी नंतर ते आज प्रथमच पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

देशमुख म्हणाले की, मला माढा लोकसभेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वसर्वेा शरद पवारांकडे केली आहे. माझा कोणाच्या उमेदवारीला अजिबात विरोध नाही किंवा त्यांच्या कामाबद्दल आक्षेपही  नाही. तरीही मतदार संघातील पाणी, रोजगार आणि शिक्षणासारखे मुलभूत प्रश्न प्रलंबीत आहेत. या प्रश्नांवरती आणखी काम करावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासकीय सेवेतील अनुभावाचा फायदा लोकांच्या सेवेसाठी करायचा आहे म्हणूनच, मी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button