breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खालापूरजवळ ट्रकची टँकरला धडक, एकाचा मृत्यू

लोणावळा  – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूरजवळ भरधाव वेगातील साखरेच्या ट्रकची समोरुन जाणाऱ्या टँकरला जोरदार धडक बसली. धडकेनंतर हा ट्रक पूर्णतः उलटला. या दुर्घटनेत ट्रकच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. मोहम्मद सुलतान असे मृत्युमुखी पडलेल्या क्लिनरचे नाव आहे तर चालक मोहम्मद मुज्जफिर गंभीर जखमी झाला आहे. हे दोघंही मूळचे हरियाणातील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  मुंबईच्या दिशेने साखर घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून वाहनाची समोरुन जाणार्‍या टँकरला धडक बसली. यानंतर ट्रक रस्ता दुभाजकाला लावण्यात आलेल्या ब्रायफ्रेन रोपवर सुमारे 150 फुट घासत जाऊन उलटला. यामध्ये गाडीतील क्लिनर रस्त्यावर पडलेल्या साखरेच्या पोत्यांखाली दबला गेल्यानं त्याचा मृत्यू झाला, तर चालक गाडीतच अडकला होता. बोरघाट- खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबी पथक आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढून तातडीनं रुग्णालयात दाखल केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button