breaking-newsराष्ट्रिय

खाकीचा धाक दाखवून पायावर घासायला लावलं नाक ?

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यात एका पोलिसाचं लाजिरवाणं कृत्य समोर आलं आहे. या पोलिसाने आपल्या खाकी वर्दीचा धाक दाखवून एका युवकाला पायावर नाक घासायला भाग पाडलं. तसेच त्या पोलिसाने बेल्टच्या सहाय्याने युवकाला मारहाण केली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई करत पोलीस शिपाई विजेंद्र सिंग याला निलंबित केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पैशांच्या व्यवहारावरुन या युवकाचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. त्या व्यक्तीने पोलीस शिपाई विजेंद्र सिंग याला बोलावून युवकाला मारहाण केली. पोलिसासोबत त्या व्यक्तीनेही युवकाला मारहाण केली. त्यानंतर खाकीचा धाक दाखवून पोलिस शिपायाने तरुणाला पायावर नाक बळजबरी पायावर नाक रगडायला भाग पाडलं. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई करत त्या पोलीस शिपायाचं निलंबन केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button