पिंपरी / चिंचवड

खराळवाडीत राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात  साजर

पिंपरी, (महा-ई-न्यूज) –  महापालिकेचे उर्दू माध्यमिक विद्यालय खराळवाडी व रयत विद्यार्थी विचार मंच संस्था आयोजित राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्त पद्धतीने सहभाग नोंदवून शाकाहारी, मांसाहारी, व गोड पदार्थ बनवले होते. या पाक कलेचे परीक्षक मुख्याध्यापिका उत्तरा कांबळे, संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, सलाम इनामदार, शफिउल्ला काझी होते.

पाक कला स्पर्धा मधून ४ विजेते ठरवण्यात आले यामध्ये पहिला क्रमांक शेख मोहंम्मद झैद द्वितीय क्रमांक सय्यद शिफा शहजाद तृतीय क्रमांक शेख सना खलीलया विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह  व उत्तेजनार्थ म्हणून १०१ रुप्याचे बक्षिस रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने देण्यात आले.

यावेळी मुख्याधिपिका उत्तरा कांबळे यांनी विद्यार्थ्यंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. मशमुम नाजीर, हिना बागवान हे शिक्षक व रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे पदाधिकारी संतोष शिंदे, रोहित कांबळे, मेघा आठवले, अंजना गायकवाड, भाग्यश्री आखाडे, कोमल बोर्डे, नीरज भालेराव, महेश गायकवाड, प्रीतम वाघमारे, आनंद विजापूरे उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button