breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खड्ड्यांची खोटी माहिती देणा-या शहर अभियंत्याना निलंबित करा

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी

पिंपरी – स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणा-या पिंपरी चिंचवड शहर किरकोळ पावसाने खड्डेमय झाले आहे. शहरात अजूनही 350 खड्ड्याचे फोटोसह पुरावे नागरिकांना दिले असताना शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी खड्डे बुजविल्याची चक्क खोटी माहिती देत आहेत. त्यांना निलंबित करुन खातेनिहाय चैाकशी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली.

पिंपरी चिंचवड शहरात खड्याने एका महिलेचा बळी घेतला आहे. विशेषतः पावसाळ्यात पाणी साचल्याने त्याचा अंदाज न येऊन दुचाक्‍यांचे अपघात वाढले आहेत. पावसाळ्यात डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची चाळण झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे नागरिकांच्या जिविताशी खेळण्याचा काम करीत आहेत.  महापौर नितीन काळजे यांनी तातडीने खड्डे बुजविण्याचा आदेश दिला.तरी त्याच्या आदेशला केराची टोपली दाखविली आहे. पावसाची रिमझिम सुरू असतानाही हे खड्डे बुजविण्याचे काम आता सुरू झाले आहे. पावसाळा असल्याने ते लगेचच पुन्हा खड्डे उखडणार आहेत

दरम्यान, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शहर खड्डेमुक्त झाल्याने पालिकेतील सत्ताधारी भाजपवर सडकून टीक केली. तसेच शहरातील रस्त्यावर जेवढे खड्डे आहेत. त्या खड्ड्यासह सेल्फी काढून तो फोटो व्हॅाट्सअॅपवर पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर 17 ते 22 जूलैदरम्यान तब्बल 350 खड्याचे फोटो आले आहेत. त्यांना उद्या (गुरुवारी) सकाळी 11 ते 5 या वेळेत एका फोटोला शंभर रुपये वाटप करण्यात येणार आहेत.  तसेच खड्यांची माहिती शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी दिशाभूल करणारी दिली. शहरात खड्डे असतानाही खड्डे बुजविल्याचा दावा ते करीत आहेत. त्यामुळे खोटी माहिती देणा-या शहर अभियंत्यावर निलंबित करुन त्यांची खातेनिहाय चैाकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते साने यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button