breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खडकीत एटीएम बनले मद्यपीचा अड्डा

खडकी –  येथील विविध बँकांचे ‘एटीएम’ दुर्लक्षित आहेत. एटीएम केंद्रात कचरा, शेण, जनावरांचा वावर वाढला आहे. यासह केंद्रांमध्ये मद्यपींचा मुक्काम होत आहे. मद्यपींच्या या ठिय्यामुळे येथे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना अडथळा होतो. तसेच सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. संबंधित बँक, सुरक्षा एजन्सी आणि पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष आहे.

खडकीतील एक्ससेल्सियर शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये तीन ते चार एटीएम केंद्र आहेत. हे सर्व बºयाच वेळा बिघडलेल्या अवस्थेत असतात. येथील एका एटीएम केंद्राबाहेर कधीतरी सुरक्षारक्षक बसलेला पहावयास मिळतो. इतर एटीएमही सतत उघडी असतात. आतमध्ये कचरा असतो. रात्री नऊनंतर येथील एटीएमच्या आत मद्यपी आराम करत असतात. त्यांचे कपडे व इतर सामानही आतमध्ये विखरून पडलेले असते. कधीकधी तर हे मद्यपी आतमध्येच उलट्या करून घाण करतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटलेली असते. हे एटीएम केंद्र मुख्य रस्त्यावर आहे. या एटीएम केंद्रात मद्यपी झोपल्याचे दिसते. अनेक वेळा पोलीसही येथून ये- जा करतात. मात्र मद्यपींना हटकण्यात येत नाही. एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी येणाºया महिलांचे विशेष कुचंबणा होत आहे. या मद्यपींना बघून महिला पैसे न काढताच परत जात आहेत. त्यामुळे येथील एटीएम सुरक्षित करावे, अशी मागणी खडकीकर करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button