breaking-newsपिंपरी / चिंचवड

खडकीच्या झोपडपट्टीवर कारवाई ; पुलाचे रखडलेले काम जलदगतीने पुर्ण होणार

पिंपरी – हॅरिस पुलाच्या नवीन पुलाना अडथळा ठरणा-या झोपडपट्टीवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने आज शनिवारी कारवाई केली. त्यामुळे पुलाचे रखडलेले काम जलदगतीने पुर्ण होण्यास मदत होणार आहे. 

जून्या पुणे-मुंबई महामार्गावर सकाळी व संध्याकाळी दररोज तासन्ंतास वाहतूक कोंडी निर्माण होवून वाहनांचा रांगा लागत होत्या. त्यामुळे वाहनचालकांना कित्येक वर्षे त्रास होवू लागला होता. वाहतूक कोडीं कमी होवून त्यांचा त्रास कमी व्हावा, याकरिता पुणे आणि  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जून्या हॅरिस पुलाला समांतर दोन पूल बांधण्यास मंजूरी दिली. त्यानंतर अडथळा नसल्याने डाव्या बाजूच्या पुलाचे काम पुर्ण झाले. तसेच उजव्या बाजूच्या पुलाचे देखील अर्धे काम झालेले आहे. परंतू, खडकी येथील झोपडपट्टीचा अडथळा  ठरल्याने त्या पुलाचे काम रखडले होते.

खडकी येथील अतिक्रमणे व झोपडपट्ट्या हटविल्याशिवाय रखडलेल्या पुलाचे काम पुर्ण होणार नव्हते. त्यामुळे अखेर पुणे महापालिकेने शनिवारी सकाळी 10 वाजता कडक कारवाई करुन ही अतिक्रमणे हटविली आहेत. महापालिकेच्या अधिकारी व मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. त्यामुळे हॅरिस पुलाच्या रखडलेल्या कामाला गती मिळणार असून लवकरच नवीन बांधलेले समांतर वाहतुकीसाठी खुले होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button