पिंपरी / चिंचवड

खंडाळा घाटात कंटेनर उलटल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

पिंपरी ( महा ई न्यूज) – मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात उतार वळणावर भरधाव वेगातील कंटेनर उलटला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तिन्ही लेन बंद पडल्यामुळे दूर जाणा-या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. सोमवारी (दि. 24) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंबईकडे जाणारी सर्व वाहने लोणावळा एक्झिटजवळून जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर वळविण्यात आली आहेत. महामार्ग पोलीस व आयआरबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button