breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खंडणी मागितल्या प्रकरणी सहा जणाविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी – दोन लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सुरू असून आरोपींनी यापूर्वी साडेतीन लाख रुपयांची खंडणी घेतली आहे.

विक्रम परशुराम बेखत्यारपुरी (वय 29, सायली पार्क, बंगलो नंबर 1, राहटणी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सचिन राकेश सौदाई (वय 32), ओंकार मेढेकर (वय 26), नदीम ताजुदीन मनेर (वय 20), संतोष कुरावत (वय 32), सनी सौदाई (26, सर्व रा. काळेवाडी) आणि प्रशांत (पूर्ण नाव माहिती नाही) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील राकेश, ओंकार आणि नदीम यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम हे हॉटेलचा व्यवसाय करतात. मागील सहा महिन्यांपासून सचिन आणि संतोष यांनी विक्रम यांना वारंवार वेगवेगळ्या फोनवरून खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून जाऊन विक्रम यांनी आरोपींना वारंवार तीन लाख 50 हजार रुपयांची खंडणी दिली. त्यानंतर 8 जून रोजी पुन्हा अजून दोन लाख रुपये देण्याची मागणी केली. घाबरलेल्या विक्रम यांनी यावेळी सरळ पोलीस ठाणे गाठले. पिंपरी पोलिसांनी तिघांना अटक केली असून अन्य तिघांचा शोध पोलीस घेत आहेत. पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू ठुबल तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button