breaking-newsराष्ट्रिय
खंडणीप्रकरणी अबू सालेमला ७ वर्षांचा तुरुंगवास
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला दिल्लीतील सत्र न्यायालयाने खंडणीप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरण आणि १९९५ मध्ये बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्या प्रकरणात सालेम दोषी असून सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
दरम्यान, त्याने २००२ मध्ये दक्षिण दिल्लीत ग्रेटर कैलाश भागात राहणारे व्यावसायिक अशोक गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी देत जीवाच्या रक्षणासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केली होती. याच खटल्याचा निकाल आज आला असून त्यानुसार सालेमला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.