breaking-newsराष्ट्रिय

क्वात्रोची आणि अँडरसन हे राहुल गांधींचे मामा-मोदी

बोफोर्स घोटाळ्यात हात असलेला क्वात्रोची आणि भोपाळ गॅस दुर्घटनेला जबाबदार असलेला अँडरसन हे दोघे राहुल गांधींचे मामा होते. त्याचमुळे त्यांना भारतात गुन्हे करूनही खास विमानाने अमेरिकेला पळवून देण्यात आले असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मध्यप्रदेश आणि इतर राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. भोपाळमध्ये झालेल्या गॅस दुर्घटनेमुळे हजारो लोकांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अँडरसनला राजीव गांधींनी पळवून लावले. अँडरसन आणि क्वात्रोची या दोघांनाही लपून छपून अमेरिकेत पोहचवण्यात आले शिवराज सिंह चौहान यांच्यावर आरोप करण्याआधी या दोघांबाबत आईला विचारा असाही खोचक सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

Arey naamdaar, Shivraj ji ko log mama kehte hain aap usse pareshan hain, achha hota aap Quattrocchi mama ko zara yaad kar lete. Jinko aapne Hindustan ki suraksha ke dhan ko lutane ke permit de diye they,Bofors ka kaand kar diya tha, aapke mama Quattrocchi yaad kyun nahi aaye?: PM

View image on Twitter

ANI

@ANI

Shivraj ji ko gaali dene se pehle, zara aapke mama ko bhi yaad kar lo. Mama Quattrocchi aur doosre mama Anderson, special hawai jahaz mein unko America pahucha diya gaya tha. Bhopal mein hazaron gas peediton ki maut ka gunehgaar, usko chori chhupe pahcuha diya gaya tha: PM in MP pic.twitter.com/89rtCV5hrM

View image on Twitter

227 people are talking about this

शिवराज सिंह चौहान यांना लोक मामा म्हणतात त्यामुळे तुमची अडचण होते आहे. तुमचे मामा अँडरसन आणि क्वात्रोची या दोघांनी काय केले आहे? ते जरा विचारा. भारताच्या तिजोरीवर या दोघांनीही डल्ला मारला. भारतीय सुरक्षेचे तीन तेरा वाजवले. बोफोर्स घोटाळा माझ्या मामानेच केला हे जरा मध्यप्रदेशातल्या लोकांना सांगा की असेही नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे.

ANI

@ANI

Arey naamdaar, Shivraj ji ko log mama kehte hain aap usse pareshan hain, achha hota aap Quattrocchi mama ko zara yaad kar lete. Jinko aapne Hindustan ki suraksha ke dhan ko lutane ke permit de diye they,Bofors ka kaand kar diya tha, aapke mama Quattrocchi yaad kyun nahi aaye?: PM

504 people are talking about this

काँग्रेस नेते राज बब्बर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते त्याचेही उत्तर नरेंद्र मोदींनी भाषणात दिले. माझ्या आईला राजकारणातला र देखील माहीत नाही. पूजा करणे, देवासमोर जप करत आपला वेळ घालवणे हीच तिची दिनचर्या आहे. माझ्याशी सामना न करता येणाऱ्या काँग्रेसने माझ्या आईलाही राजकारणात खेचले असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

ANI

@ANI

Jab mudde nahi hote, kusanskar bhare hote hain, ahankar saatven aasmaan par hota hai, tab jaakar kisi ki maa ko gaali dene ki himmat aati hai…Azadi ke baad jisne itne saal raaj kiya, us party ke jimmewar log Modi ke saath bhidne ke bajaye, Modi ki maa ko gaali de rahe hain: PM

View image on Twitter

ANI

@ANI

Jis maa ko rajneeti ka ‘R’ maloom nahi hai, jo maa apni puja paath, ghar mein bhagwan ke smaran mein apna samay bita rahi hai us maa ko rajneeti mein ghaseet ke liye. Congress ke log Modi se mukabla karne ki aapki taakat nahi hai: PM Modi in Chhatarpur, Madhya Pradesh pic.twitter.com/FmlHsvJVU4

View image on Twitter

486 people are talking about this

काँग्रेसकडे माझ्याविरोधात बोलण्यासारखे मुद्दे उरलेले नाहीत. म्हणून आता माझ्या आईला नावे ठेवली जात आहेत. माझ्या आईचा अपमान केला जातो आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पक्षाने देशावर सर्वात जास्त काळ राज्य केले ते त्या जबाबदार पक्षाचे लोक माझा सामना करण्याऐवजी माझ्या आईवरून माझ्यावर टीका करत आहेत ही खरोखरच लाजिरवाणी बाब आहे असेही मोदी यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button