breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चिंचवड येथील पुतळ्यास महापौर राहुल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्याचप्रमाणे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याही पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

चिंचवड स्टेशन येथे झालेल्या या कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, माजी नगरसदस्य राम पात्रे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, सहाय्यकआरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, अरुण जोगदंड, भाजपचे अमित गोरखे, संदीपान झोंबाडे, नितीन घोलप, संजय ससाने, मनोज तोरडमल, गणेश क्षिरसागर, शिवाजी साळवे, अनिल सौंदाडे, किशोर हातागळे, संजय ससाने, सुर्यकांत गायकवाड, गणेश साठे, सतिश भवाळ, सिध्दार्थ वाघमैतर, आसाराम कसबे, विशाल कसबे, संदिप जाधव, मोहन वाघमारे, श्रावण बगाडे, सचिन सकट, अमित भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button