breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

क्रांतीवीरांचे विचारांची ज्योत तेवत ठेवणे ही युवकांची जबाबदारी; पार्थ पवार यांचे आवाहन

– चिंचवडमधील क्रांतीवीर चापेकर यांच्या स्मारकास अभिवादन
पिंपरी। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यामुळेच आज आपण स्वातंत्रपणे जीवन जगत आहोत. क्रांतीकारकांनी चेतवलेली राष्ट्रभक्तीची ज्योत आपण त्यांच्या विचाररुपाने कायम तेवत ठेवली पाहिजे. त्यासाठी देशातील युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशा भावना राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी व्यक्त केल्या.
चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्या स्मारकालाशहिद दिनानिमित्त पार्थ पवार यांनी शनिवारी भेट दिली. तसेच, पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मयुर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, अपर्णा डोके तसेच अतूल शितोळे आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी दौरा काढला होता. त्यावेळी शहरातील विविध ठिकाणी त्यांनी भेट दिली. या दौ-याला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
***
नेवाळे मिसळवर मारला ताव…
चिंचवड येथील दौऱ्यात सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न पार्थ पवार यांनी केला. संपूर्ण शहरात प्रसिद्ध असलेल्या नेवाळे मिसळ हाउसला त्यांनी भेट दिली. याठिकाणी झणझणीत मिसळवर त्यांनी ताव मारला. तसेच मुख्य बाजारातील व्यापारी, ग्राहक आणि स्थानिक नागरिकांशीही पार्थ पवार यांनी संवाद साधला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button