breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापुरातील मराठा आंदोलन स्थगित : मंत्री उपसमितीची शिष्टाई यशस्वी

कोल्हापूर – मराठा आरक्षणाबाबतची वैधानिक कार्यवाही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे २२ मागण्यांचे लेखी आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाच्या उपसमितीने आंदोलकांना दिले. त्यामुळे गेले ४२ दिवस कोल्हापुरात सुरू असलेले सकल मराठा समाजाचे आंदोलन स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारी घेण्यात आला.
दरम्यान, मंत्रिगटाने शाहू जन्मस्थळावर येऊन लेखी आश्वासन दिल्याने शाहू छत्रपतींच्या विनंतीला मान देऊन आंदोलन स्थगित केल्याची माहिती आंदोलकांनी पत्रकार परिषदेत दिली;

पण सरकारने नोव्हेंबरपर्यंत मागण्यांची पूर्तता न केल्यास १ डिसेंबरला पुन्हा मुंबईवर वाहन मोर्चा काढून सरकारला सळो की पळो करून सोडू, असाही इशारा यावेळी देण्यात आला. शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळनंतरच कोल्हापुरातील आंदोलन स्थगित करण्याबाबत राजकीय क्षेत्रातून वेगवान हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनेक सामाजिक क्षेत्रांतील नेत्यांना पुढे करून या आंदोलनाबाबत फोनवरून चर्चा केली. त्यानंतर शनिवारी दिवसभर आंदोलकांच्या समन्वयकांशी गोपनीय चर्चा, बैठका घेण्यात आल्या.

त्यामध्ये शाहू छत्रपती यांचाही पुढाकार होता. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात सुमारे तासभर मंत्रिगटाच्या उपसमितीची बैठक घेतली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच पाच आमदारांची सुमारे तासभर बैठक बंद खोलीत झाली. त्यानंतर या मंत्रिगटाच्या उपसमितीने कसबा बावड्यातील लक्ष्मीविलास पॅलेस या शाहू जन्मस्थळी येऊन आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच हे आंदोलन स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

दुपारी चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर आल्यानंतर मंत्रिगट उपसमितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी शासकीय विश्रामगृहाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे तासभर ही बैठक बंद खोलीत झाली. या बैठकीस, मंत्री पाटील यांच्यासह मंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आम. राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर तसेच आंदोलनातील समन्वयक दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, स्वप्निल पार्टे, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, उपस्थित होते. बैठकीनंतर सर्वांनी एकत्रित कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू जन्मस्थळी येऊन आंदोलन स्थगितीची घोषणा केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button