breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कोरेगाव भीमा प्रकरण ; चौकशी आयोगाकडे १७७ शपथपत्रे दाखल

पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे आतापर्यंत १७७ शपथपत्रे विविध व्यक्ती, संघटनांनी दाखल केली आहेत.  शपथपत्र दाखल करण्यासाठी आयोगाने मुदत वाढवून दिली असून आता १६ जुलैपर्यंत लोकांना तसेच संघटनांना शपथपत्रे आयोगाकडे सादर करता येतील.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या चौकशीसाठी शासनाने चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे़ एऩ पटेल आणि राज्याचे मुख्य सचिव यांची चौकशी समिती फेबु्रवारी महिन्यात नेमण्यात आली आहे. या समितीला चार महिन्यात चौकशी करुन अहवाल द्यायचा आहे़

चौकशी आयोगाने १२ मे रोजी जाहीर आवाहन करुन ती घटना, त्या घटनेपूर्वीच्या आणि त्यानंतरच्या अशा इतर संबंधित घटना या बद्दलची व्यक्तीगत माहिती असलेल्या व्यक्ती, त्या घटनेमुळे बाधित झालेल्या व्यक्ती तसेच संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून शपथपत्राच्या स्वरुपात त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यासाठी १० जूनपर्यंत मुदत होती. या मुदतीत आयोगाकडे पुणे कार्यालयात १६९ शपथपत्रे तर मुंबईतील कार्यालयात ८ शपथपत्रे सादर झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button