breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कोरेगाव-भीमा प्रकरणी सुधीर ढवळेंसह तिघेजण अटकेत

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर धवळे यांना त्यांच्या मुंबईतील घरातून पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर वकिल सुरेंद्र गडलिंग आणि रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. या तिघांचाही या हिंसाचारात हात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे एल्गार परिषद झाली होती. या परिषदेत चिथावणीखोर भाषणे आणि गाणी गायली होती. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात आहेत असा आरोप करण्यात येत होता. त्यामुळेच १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे दंगल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button