breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरियन विद्यार्थी सांगताहेत स्वच्छतेचे महत्व 

दक्षिण कोरियातील विद्यापीठांचा  ‘सेव्ह टू अर्थ’ उपक्रम
पिंपरी –  रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात दक्षिण कोरियामधील विद्यापीठातून परदेशी विद्यार्थी आले आहेत. ‘सेव्ह टू अर्थ’ या उपक्रमाअंतर्गत हे विद्यार्थी स्वत: श्रमदान करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहेत. तसेच, पृथ्वीचे संवर्धन, वाढते प्रदूषणाबाबत जनजागृती करत आहेत.
दक्षिण कोरिया देशातील विविध विद्यापीठांचे एकूण २५ विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. बंंगळुरू, मुंबईनंतर हे विद्यार्थी  पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत.  त्यांंच्यामार्फ त शहरात १ ते २० ऑगस्ट या कालावधीत विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच, विविध भारतीय विद्याथ्र्यांशी संवाद साधला जात आहे. या विद्याथ्र्यांनी शुक्रवारी (दि.१७) सकाळी संभाजीनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता केली. त्यांच्या मोहिमेत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झोले.
प्रत्यक्ष स्वच्छतेबरोबर नागरिकांमध्ये स्वच्छता व पर्यावरणविषयक जनजागृती या विद्याथ्र्यामार्फत केली जात आहे. या मोहिमेमागे कोरियन आपल्या देशासोबत जगातील इतर देशापर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा उद्देश असल्याचे या कोरीयन विद्याथ्र्यांनी सांगितले आहे. या मोहिमेप्रसंगी प्राचार्य पांडुरंग गायकवाड, उपप्राचार्य ए. एम. शेख, संजिविनी पाटील, डॉ. प्रमोद बोत्रे, अलका चव्हाण, कामायनी सुर्वे, विलास कुमावत,  माधव भंडारी, संदीप शिंदे, राजेंद्र मेचकर, माधव सरोदे आदी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button