breaking-newsमनोरंजन

‘कॉफी विथ करण ६’मध्ये लवकरच ‘बाहुबली’ आणि ‘भल्लाल देव’

‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं?’, या प्रश्नाने सबंध देशाला वेड लावलं होतं. ‘बाहुबली : द बिगनिंग’ या चित्रपटानंतर सर्वजण या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊ लागले. त्याचं उत्तर घेऊन ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. एस. एस. राजामौली दिग्दर्शित या दोन्ही चित्रपटांनी कलाविश्वात सर्वोत्तम चित्रपट निर्मितीचं एक उदाहरण सादर केलं. ‘बाहुबली’, ‘भल्लाल देव’, ‘शिवगामी’, ‘कटप्पा’ ही नावं सर्वांच्या परिचयाची झाली. या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे सूत्रधार म्हणजेच दिग्दर्शक राजामौली त्यांच्या दोन आवडत्या कलाकारांसोबत लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावणार आहेत. हे दोन आवडते कलाकार म्हणजेच अभिनेता प्रभास आणि राणा डग्गुबती.

राजामौली, प्रभास आणि राणा या त्रिकूटासोबत करणच्या गप्पा रंगणार आहेत. पडद्यासमोरील आणि पडद्यामागील बऱ्याच गोष्टी करण त्याच्या प्रश्नातून उलगडण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा या तिघांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांना कळणार आहेत. ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून ओळखला जाणारा प्रभास त्याच्या लग्नाविषयी काय सांगणार याचीही प्रचंड उत्सुकता चाहत्यांना आहे. त्यामुळे ‘कॉफी विथ करण’चा एपिसोड नक्कीच खास असणार आहे.

करण जोहरने सोशल मीडियावर या तिघांसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘कॉफी विथ करण’चा यंदाचा सिझन बऱ्याच कारणांसाठी चर्चेत राहिला आहे. अर्जुन कपूर, मलायका अरोरा, जान्हवी कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण यांसारख्या सेलिब्रिटींनी आतापर्यंत या शोमध्ये हजेरी लावली. या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या शोमध्ये उलगडल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button