breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कॉंग्रेसला जोरदार धक्का : पश्चिम महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते भाजपच्या संपर्कात

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पुन्हा एकदा जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि सांगलीतील काँग्रेस नेते प्रतीक पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे भगदाड पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसचे प्रतीक पाटील यांची भेट झाली आहे. मात्र, ही भेट राजकीय कारणासाठी झाली नसल्याचं प्रतीक पाटील यांनी म्हटलं आहे. असं असलं तरीही निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीने जोरदार चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांनी मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सुजय विखे पाटील यांची नगरमधून लोकसभा उमेदवारीसाठी केंद्रीय समितीकडे शिफारस करणार आहोत, अशी घोषणाही केली आहे. सुजय यांच्या भाजप प्रवेशादरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, बबनराव पाचपुते आदी नेते देखील उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button