breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कै. ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी पहाट उत्साहात

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – कै. ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठान आणि लायन्स क्बल ऑफ पुणे मेट्रोपॉलीस यांच्या संयुक्त विद्यमान सोमवारी (दि. 5) पिंपळे निलख येथील विशालनगरमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम सादर करण्यात आला. दिवाळीनिमित्त पहाटेची भक्तिगीते, अभंग, ओव्या तसेच जुन्या-नवीन गीतांच्या गायनाचा नागरिकांनी आनंद लुटला.

कार्यक्रमाची सुरूवातच उठा-उठा हो गजानन… या गीताने झाली. समाधी, साधना, अवचिता परिमळू…, नाम आहे आदि अंती…, देव माझा विठू सावळा…, दिनांचा कैवारी…, अणू रेणीया थोकडा…, -हदयी जागा तू अनुरागा…, धुंदी कळ्यांना… अशी एकसे बढकर एक गीते गाण्यात आली. ओम जय जगदीश हरे… या गीतासाठी प्रेक्षकांनी साथ दिली. लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा…  हे शेवटचे गीत सादर करण्यात आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांना फराळ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमात नगरसेवक तुषार कामठे, गौरव महाराष्ट्राचा कलर्स मराठी फेम गायक तुषार रिठे, आसावरी गोडबोले, सिंथेसायझर सुनिल जाधव, तबला अमित कुंटे, ढोलकी/ढोलक वादक संतोष पवार, -हीदम मशिन वादक संजय खाडे, तालवाद्य सागर रिठे यांनी सदाबहार गीते सादर केली. यावेळी नगरसेविका आरती चोंधे यांनी केलेल्या समाजकार्याचा उलघडा संकेत चोंधे यांनी केला. यावेळी कै. सुरेश चोंधे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्नदा रठे यांनी केले. प्रास्ताविक भरत इंगवले यांनी केले. चोंधे यांनी आभार मानले.

 

कै. सुरेश ज्ञानोबा चोंधे यांनी सुरू केलेल्या समाजकार्याच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी सुरू केलेल्या समाजकार्याचा वसा आम्ही त्यांच्या बरोबरीने नाही, परंतु, त्यांच्यासारखे करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत. हा वसा यापुढेही असाच चालू ठेवणार आहे.

संकेत चोंधे, युवा कार्यकर्ते

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button