breaking-newsआरोग्यपुणेमहाराष्ट्र

केवळ 30 टक्‍के रुग्णालय परवान्यांचे नुतनीकरणे

  • कायद्यातील तरतूदी जुन्याच अंमलबजावणी मात्र कडक

पुणे– रुग्णालयांना रुग्णालय चालविण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवान्यांचे नुतनीकरण करण्यात येत असून आतापर्यंत केवळ तीस टक्‍के परवानांचे नुतनीकरण पालिकेच्या आरोग्य विभागाकडून झाले आहे. 360 अर्जांपैकी 108 जणांना परवाना देण्यात आला आहे. तर 114 प्रकरणांची तपासणी पूर्ण झाली असून त्यांच्यावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. तर केवळ 142 प्रकरणांची तपासणी करणे बाकी आहे.

डॉक्‍टरांकडे कागपत्रे पूर्ण असतील तर परवान्यांचे वाटप लगेचच काही दिवसांत होईल परंतु अनेक डॉक्‍टरांकडे संबंधित कागदत्रेच नसल्याचे समोर येत आहे. कागदपत्रांबाबचे आक्षेप पूर्ण केल्यास नुतनीकरण अरोग्य विभागाकडे नुतनीकरणासाठी आलेल्या 360 अर्जांपैकी 114 अर्जांची कागदपत्रे अपुरी तसेच त्यांच्यावर आक्षेप आहेत. म्हणून हे प्रकरणे संबंधित क्षेत्रीय कार्यालयांत कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी परत पाठविली आहेत. ही कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे नुतनीकरण करण्यात येईल.
-डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून एक बेड व त्यापेक्षा जास्त संख्या असलेल्या खासगी रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग होम ऍक्‍टनुसार रुग्णालय सुरू ठेवण्याचा परवाना देण्यात येतो. यामध्ये नवीन रुग्णालयांची नोंदणी आणि जुन्यांचे नुतनीकरण हे दोन प्रकारचे परवाने देण्यात येतात. दरवर्षी परवाने नुतनीकरणाची कार्यपध्दती साधारण जानेवारी महिन्यात सुरु होऊन 31 मार्चच्या आत संपत असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. मात्र यंदा एप्रिल उलटून दोन महिने झाले तरीही हे परवाने नुतनीकरणाचे काम केवळ 30 टक्‍केच पूर्ण झाले आहे. यंदाच्या वर्षी महापालिकेने कायद्यातील जुन्याच तरतुदींची कडक अंमलबजावणी सूरू केली आहे. त्यामुळे अनेक डॉक्‍टरांचे कागपत्रेच पूर्ण नसल्याचेही समोर येते आहे. कायद्यातील तरतूदीनुसार वैद्यकिय आस्थापना या व्यावसायिक जागेत सूरू असणे किंवा बांधकाम खात्याची परवानगी असणे गरजेचे आहे. तसेच स्वतंत्र नळ जोडणी, इमारतीचा आगीचा नाहरकत दाखला, व्यावसायिक कर भरल्याचा पुरावा, नोंदणीकृत परिचारिका आदी या अटी आहेत. या अटींबरोबरच इतर मुलभूत अटी पूर्ण करणा-या रुग्णालयांना परवाना देण्यात येतो. मात्र आरोग्य विभागाच्या परवाना विभागात अपुरे मनुष्यबळ आणि कायद्याची कडक अंमलबजावणी केल्याने 31 मार्चच्या आत हे काम पूर्ण झालेले नाही. दरम्यान नुतनीकरण रखडल्याने शहरातील अनेक रुग्णालये ही विनापरवाना चालविली जात आहेत. याबाबत पुणे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने परवान्यांसाठी जाचक अटी घातल्याचा आक्षेप घेत परवान्यांचे नुतनीकरण लवकर व्हावे ही मागणी लावून धरली होती. त्यासाठी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेटही घेतली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button