breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

केवळ ४०० रुपयांसाठी दोन हत्या, निगडीतील प्रकार

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात मागील आठवड्यात दुहेरी हत्याकांड समोर आले होते. या प्रकरणात त्या दोघांची हत्या केवळ पाचशे रुपयांवरूनच झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मयताच्या मित्राने हे पैसे घेतले होते, ५०० पैकी १०० रुपये हे आरोपीला दिले असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. यातील पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी रवी मानसिंग वाल्मिकी याने सलमान शब्बीर शेख आणि सोनाली उर्फ मॅक्स या मित्र-मैत्रीणीची हत्या केली आहे. त्याच्यासोबत सचिन चव्हाण, नागेश चव्हाण, विशाल वाल्मिकी उर्फ कचरिया, प्रशांत साळवी हे देखील या कटात सहभागी होते.

आरोपी रवी मानसिंग वाल्मिकी हा रिक्षा चालक असून तो पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालवून उदरनिर्वाह भागवतो. रिक्षाचा व्यवसाय करत असताना त्याची ओळख दुसरा रिक्षा चालक अमीर शेख याच्याशी झाली. रवी हा निगडी येथे आल्यानंतर दोघांची भेट व्हायची, तीन महिण्यापूर्वी रवीने अमीर शेख यास ५०० रुपये उसने दिले होते. काही दिवसांनी रवीने अमीरकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्याने केवळ १०० रुपये हातावर टेकवले आणि उरलेले पैसे नंतर देईल म्हणून सांगितले. परंतू काही दिवसांनी अमीर हा पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. यामुळे दोघांमध्ये वाद झाला, याची माहिती अमीरने मित्र सलमान शेख याला दिली. सलमानने आरोपी रवी वाल्मिकीला देहूरोड येथील त्याच्या राहत्या घरी जाऊन पत्नीसमोर बेदम मारहाण करीत शिवीगाळ केली.

त्यानंतर १९ जुलै रोजी आरोपी रवी वाल्मिकी याच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यावेळी मित्र नागेशची रिक्षा घेऊन तो सचिन चव्हाण, विशाल कचरिया यांच्यासह निगडीच्या भक्तीशक्ती चौकात आले. तेव्हा सलमान, सोनाली उर्फ मॅक्स वाकडे तसेच प्रशांत साळवी हे त्या ठिकाणी होते. तेव्हा हे तिघेजण रवीच्या रिक्षात बसून देहूरोड येथे आले त्यानंतर येथे सलमानचा गळा आवळून रवीने खून केला. त्यानंतर सोनालीचा देखील पायाने गळा दाबून खून केला. सलमानचा मृतदेह रस्त्याशेजारी फेकून देण्यात आला तर सोनालीचा मृतदेह नदीत फेकून देण्यात आला. मात्र, निगडी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात खुनाचा छडा लावत आरोपींना जेरबंद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button