breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केरळात महापूर; १६७ बळी; ८००० कोटींची हानी

तिरुवअनंतपुरम – केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं महापूर झाला आहे. या पुरामुळं सर्वाधिक हानी झाली आहे. जनजीवन ठप्प झालं आहे. पुरातील बळींची संख्या १६७वर पोहोचली आहे. पिके आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. एकूण आठ हजार कोटींहून अधिक नुकसान झालं आहे. हवामान विभागानं राज्यातील १३ जिल्ह्यांत रेड अॅलर्ट जाहीर केला आहे.

मुसळधार पाऊस आणि महापुरात आतापर्यंत एकूण १६७ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पी. विजयन यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना दिली. राज्यात पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. त्यात लष्कर, हवाई आणि नौदलासह तटरक्षक दल आणि एनडीआरएफची ५२ पथकांचा समावेश आहे. एनडीआरएफची पाच पथके शुक्रवारी सकाळीच तिरुवअनंतपुरम येथे पोहोचली असून, बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफची आणखी ३५ पथकं रवाना झाली आहेत.

पथनमतित्ता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझेनचेरी गावातील हजारो ग्रामस्थ पुरात अडकले आहेत. मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे आणखी मदत मागितली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button