breaking-newsराष्ट्रिय

केरळमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच; मृतांचा आकडा ७७ वर

तिरुवनंतपुरम – केरळमध्ये मुसळधार पाउस सुरूच असून अनेक भागात नागरिक अडकली आहेत. अतिवृष्टी, भूत्सखलन आणि पुरामुळे मृतांचा आकडा ७७ वर पोहचला आहे. हवाई दल, नौदल, सैन्य, एनडीआरएफकडून सातत्त्याने बचाव कार्य सुरु असून ९२६ पेक्षा अधिक लोकांना वाचविण्यात यश आले आहे. दरम्यान, हवामान विभागाने शनिवारपर्यंत पाउस सुरुच राहणार असल्याची माहिती दिली असून रेड अलर्ट जारी केला आहे.

मुसळधार पावसामुळे केरळमधील तब्बल ३३ धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढत असून गावांमध्ये पाणी शिरले आहे. यामध्ये जवळपास ३०० लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर कोचीनमधील विमानतळामध्ये पाणी घुसल्याने विमानसेवा शनिवारपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. शिवाय सार्वजनिक वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे.  शाळा, महाविद्यालयान सुट्ट्या देण्यात आल्या असून परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री विजय पिनरई यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button