breaking-newsमनोरंजन

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावला किंग खान

गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या अतिवृष्टीमुळे केरळ राज्यात महापूर आला असून, हा शतकातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पूर असल्याचं म्हटलं जात आहे. सध्याच्या घडीला केरळमध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरीही या पुरामुळे झालेल्या नुकसानाने अनेकांनाच धक्का बसत आहे.

सर्वच स्तरांतून केरळला सर्वतोपरी मदत करण्यासही सुरुवात झाली असून, स्थानिक, स्वयंसेवी संस्था आणि कलाकार मंडळीही यात मागे राहिलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचं आवाहन करणाऱ्या सेलिब्रिटींनी स्वत:सुद्धा केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये काही योगदान दिलं आहे. यात बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानही मागे राहिलेला नाही.

Kerala floods: पूरग्रस्तांच्या मदतीस आयएएस अधिकारी आले धावून; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं सोशल मीडियावर कौतुक

शाहरुख खानच्या ‘मीर फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेकडून केरळमधील पूरग्रस्तांसाठी २१ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्याच्या या मदतीसाठी केरळमधूनही किंग खानचे आभार मानण्यात आले आहेत. शाहरुख शिवाय इतरही बऱ्याच सेलिब्रिटींनी केरळसाठी सढळ हातांनी मदत केल्याचं पाहायला मिळालं. केरळमधील स्थानिक कलाकारही यात मागे राहिले नाहीत. अभिनेता तोविओ थॉमस याने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या घराची दारं खुली केली असून बचावकार्यात आपलं सहकार्य केलं. तर सुपरस्टार मोहनलाल आणि ममूथी यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देत मदतनिधीत भर घातली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button