breaking-newsक्रिडाराष्ट्रिय
‘केबीसी-10’चा प्रोमो प्रदर्शित; अमिताभ बच्चन करणार होस्ट
नवी दिल्ली: ‘कौन बनेगा करोडपती’ सीजन 10 लवकरच सुरु होणार आहे. महानायक अमिताभ बच्चन याला होस्ट करणार आहेत. केबीसी-10 चा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये एका गरीब वडिलांनी आपल्या मुलाला शिकवण्यासाठी केलेली धडपड दाखवण्यात आली आहे.
‘दंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी निखील मल्होत्रा यांच्या सोबत मिळून या प्रोमोची कॉन्सेप्ट तयार केली आहे.
‘केबीसी 10’ साठी रजिस्ट्रेशन गेल्या महिन्यापासून सुरु झाले आहेत. 6 ते 20 जूनच्या दरम्यान रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.