breaking-newsआंतरराष्टीय

कॅनडीयन राजदूताची सौदीतून हकालपट्टी

रियाध – सौदी अरेबियाने आपल्या देशातील कॅनडाच्या राजदूतांची हकालपट्टी केली आहे. या राजदूताने सौदीच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ केल्याचा आरोप सौदी सरकारने ठेवला आहे. तसेच या प्रकरणावरून त्यांनी कॅनडाशी असलेले व्यापारी संबंधही तात्पुरते थांबवले आहेत.

आम्ही कोणत्याहीं देशाचा आमच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप सहन करणार नाहीं असेही त्या देशाच्या सरकारने म्हटले आहे. मात्र कॅनडाच्या राजदूताने तेथे नेमके काय केले याचा तपशील मात्र जाहीर झालेला नाही. तथापी एका वृत्तानुसार सौदी अरेबियात काही मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या सुटकेची त्यांनी मागणी केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button