breaking-newsमनोरंजन

किरणच्या नागपूरी भाषेचं सोशल मीडियावर खास कौतुक

साधी, मनमिळाऊ अशी राजकन्येच्या रुपातून अवनी जयराम भोसले छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटी ला आली. अगदी पहिल्याच एपिसोडपासून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोनी मराठी वाहिनीवरील ‘एक होती राजकन्या’ या नवीन मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत किरण ढाणे या अभिनेत्रीने साकारलेली अवनी भोसले ही प्रेक्षकांना फार आवडली. अवनी ही मूळची नागपूरची असल्याने तिच्या बोलण्यात नागपुरी भाषेचा वापर जास्त आहे. प्रेक्षकांना ही भाषा आवडत असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे.

मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आणि किरणने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केलं. ‘विदर्भाची भाषा बोलून राहिलं नं’, ‘आतुरता पुढील एपिसोडची’, ‘कमाल अभिनय’ असे कमेंट्स सोशल मीडियावर येऊ लागले. ‘पहिला एपिसोड कसा वाटला’ असा प्रश्न किरणने सोशल मीडियावर केला होता. त्यावर प्रेक्षकांनी तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे. नागपुरी भाषेचा गोडवा वाढवणाऱ्या अवनीचा पुढील प्रवास पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अभिनेते किशोर कदम आणि अभिनेत्री किरण ढाणे यांच्या अभिनयाने सुरुवात झालेल्या या मालिकेत एकंदरीत वडील आणि मुलीच्या गोड नात्याची गुंफण पाहायला मिळत आहे. डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्नं पाहणा-या अवनीचा कॉन्स्टेबल म्हणून प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि ती नुकतीच अनुकंपा तत्वावर पोलीस खात्यात भरती झाली आहे .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button