breaking-newsआंतरराष्टीय

किम जोंग उन यांच्यासमवेत पुढील वर्षांच्या सुरुवातीला बैठक

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी दुसरी शिखर बैठक २०१९च्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीत घेतली जाईल, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. वॉशिंग्टनला परत जाताना त्यांनी एअर फोर्स वन विमानात वार्ताहरांना सांगितले, की या शिखर बैठकीसाठी तीन ठिकाणे विचाराधीन आहेत.

जूनमध्ये सिंगापूर येथे किम व ट्रम्प यांच्यात झालेली शिखर बैठक अपयशी ठरली होती. आता पुढील बैठकीबाबत विचारले असता ते म्हणाले, की जानेवारी किंवा फेब्रुवारीत अशी बैठक होईल.

किम यांना अमेरिकेत येऊ देणार का या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की कुठल्यातरी वळणावर ती वेळ येईल. जूनमध्ये ट्रम्प व किम यांच्यात चर्चा झाली होती. त्या वेळी अतिशय ढिसाळ भाषेतील मसुद्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. उत्तर कोरियाने अण्वस्त्रे नष्ट करण्याची अमेरिकेची प्रमुख मागणी असून त्यावर कुठले ठोस आश्वासन देण्यात आले नव्हते. उत्तर कोरियाने नंतर अणू व क्षेपणास्त्र कार्यक्रम बंद केल्याचे जाहीर केले होते. पण नंतर ते खोटे असल्याचे निष्पन्न झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button