breaking-newsमनोरंजन

किम कार्दशियाने दातांवर लावले हिरे

रिऍलिटी टिव्ही स्टार किम कार्दशियाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तिने दातांवर हिरे बसवून घेतल्याचे या फोटोमध्ये दिसते आहे. तिला दातांवर हिरे बसवून का घ्यावे असे वाटले, हे मात्र उलगडलेले नाही. आपले स्माईल अधिक फोटोजेनिक व्हावे हा किमचा उद्देश असावा. याबाबत फॅन्सनी तिचे कौतुक करावे अशी तिची अपेक्षा असावी. मात्र झाले उलटेच तिच्या फॅन्सनी चक्क तिला ट्रोल करायला सुरुवात केली. काही जण तर तिला चक्क वेडी म्हणाले.

आपल्याबाबत नेहमीच काही तरी खास प्रयोग करत राहणाऱ्या किमने हॉलिवूडमध्ये फॅशनचे अनेक ट्रेन्ड प्रस्थापित केले आहेत. तिच्या या फॅशन टिप्स बॉलिविइडमधील ऍक्‍ट्रेस आणि मॉडेलही फॉलो करत असतात, असे ऐकिवात आहे. आता दातांवर हिरे बसवून घेण्याचा किमचा हा प्रयोगही कदाचित फॉलो केला जाऊ शकेल. किमने यापूर्वी काही भन्नाट कॉमेंटही केल्या होत्या. त्यामुळेही ती चर्चेत आली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा आपली 4 वर्षांची मुलगी अमेरिकेचा कारभार अधिक चांगल्यारितीने चालवू शकते, असे ती म्हणाली होती. मात्र असे म्हटल्यानंतर लोकांनी तिची चेष्ठाच केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button