breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कासारवाडी दुर्घटना : पालिकेच्या निषेधार्त युवासेनेचे अमरण उपोषण

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – कासारवाडी येथील महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरु असताना इमारतीची भिंत कोसळून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी अधिकारी यांना निलंबित न करता दोषींना पाठीशी घालण्यात आले आहे. असा आरोप करत याच्या निषेधार्त युवासेनेच्या वतीने अमरण उपोषण सुरू करण्यात येत आहे.

कासारवाडी येथील यशवंत प्राईड इमारती शेजारी (दि . ४) ड्रेनेज लाईनचे काम चालू होते. अधिकारी व कॉन्ट्रैक्टर यांनी निष्काळजीपणे व कुठलीही पूर्व खबरदारी न घेता खोदाई केली. त्यामुळे शेजारील इमारतीची भिंत कोसळली. तिघेजण त्याखाली अडकले होते. यामध्ये ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

या विषयी युवासेना पिंपरी यांच्या वतीने (दि. ६) निवेदन देऊन संबंधित दोषी अधिकारी व कॉन्ट्रैक्टर यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, महानगर पालिकेने दोषी अधिका -यांना  पाठीशी घालण्याचा उद्योग केला आहे. ठेकेदारावर या प्रकरणी दोष ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी महापालिकेच्या दोषी अधिका -यांना निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button