breaking-newsराष्ट्रिय

काश्‍मीरमध्ये पोलीस कस्टडीतून दहशतवादी फरार – दोन पोलीस निलंबित

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – पोलीस कस्टडीतून एक दहशतवादी फरार झाल्याने दोन पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरात पोलीस कस्टडीतील एक दहशतवादी फरार झाला आहे. अब्दुल मजीद मीर नावाचा लष्कर ए तैयबाच्या या दहशतवाद्याला सुनावणीनंतर पोलीस न्यायालयातून पुन्हा तुरुंगात नेत असताना तो पळून गेला. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर रोजी लष्कर ए तैयबाचा दहशतवादी अब्दुल मजीद मीर याला तीन तासांच्या चकमकीनंतर अटक करण्यात आली होती. त्याच्या फरार होण्याचा तपास चालू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी जबाबदार असलेल्या दोन पोलीसांना ताबडतोब निलंबित केल्याचेही त्यांने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button