breaking-newsराष्ट्रिय

काश्मीरमध्ये चकमकीत ४ दहशतवादी ठार

कुपवाडा: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जवानांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केला आहे.

हंदवाडा परिसरातील जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना काल, शुक्रवारी मिळाली होती. सुरक्षा दलांनीही तातडीनं शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यात चार दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. शोधमोहीम अद्याप सुरूच आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button