breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस मार्ग सुरु करा

पिंपरी –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम अर्थात बीआरटीएस प्रकल्प हाती घेतला. सुरुवातीला मोठा गाजावाजा झाला. परंतु, मागील अडीच वर्षात बीआरटीएस प्रकल्पांकडे महानगरपालिका प्रशासनाने पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग सुरू करण्यामधील प्रमुख अडथळा चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचा होता. हा उड्डाणपूल सुरू झाल्याने महापालिकेने हा रखडलेला काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस मार्ग तातडीने सुरू करावा, अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात अमित गोरखे यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात अमित गोरखे यांनी म्हटले आहे की, अहमदाबादच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरात बीआरटीएस प्रकल्प केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुननिर्माण (जेएनएनयुआरएम) योजनेअंतर्गंत राबवण्यात आला. त्यावर महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. शहरात प्रमुख पाच मार्गावर बीआरटीएस बससेवा सुरू करण्याचा महापालिकेचा मानस होता. मात्र्, सप्टेंबर २०१५ मध्ये औध-रावेत आणि नोव्हेंबर २०१५ मध्ये नाशिका फाटा ते वाकड या मार्गावर महापालिकेने बीआरटीएस बससेवा सुरू केली. परंतु, त्यानंतर अडीच वर्षात बीआरटीएसचे काम संथ गतीने सुरू केला आहे. अडीच वर्षात एकही नवीन बीआरटी मार्ग महानगरपालिकेला सुरू करता आलेला नाही.
सांगवी-किवळे बीआरटी मार्ग व देहू-आळंदी रस्ता या दोन रस्त्यांना जोडणारा काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग शहरवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. एकूण १०.७० कि.मी. लांबीचा हा बीआरटी मार्ग आहे. काळेवाडी फाट्यापासून स्पाईन रस्त्यापर्यंत एकूण ११ बसथांबे आहेत. या मार्गाचे 2010 पासून वेगवेगळ्या पाच टप्प्यात काम सुरू असून हे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. बसथांबे कॅरिडॉर महानगरपालिकेने तयार केलेले आहेत.  मात्र, या बीआरटीएस मार्गावरील एम्पायर इस्टेट उड्डाणपूल हा प्रमुख अडथळा होता. हा उड्डाणपूल महानगरपालिकेने नुकताच खुला केला आहे. त्यामुळे काळेवाडी, पिंपरी, चिंचवड, चिखली, मोशी, हिंजवडी, वाकड, देहू आणि आळंदी या भागातील नागरिकांना या रस्त्याचा फायदा होत आहे. या मार्गावरील बीआरटीएस रस्ता सुरू झाल्यानंतर या मार्गाचा फायदा  सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. मात्र, बीआरटीएस विभागाच्या नियोजनाअभावी हा मार्ग सुरू करण्यास विलंब होत आहे.
बीआरटीएस मार्गात मोरवाडी येथे आयुक्त बंगल्याजवळील एका कंपनीचा न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यामुळे बीआरटीएस मार्ग सुरू करण्यास विलंब होत असल्याने तोडगा काढून महानगरपालिकेने तुर्तास मोरवाडी न्यायालयाजवळील रस्त्याचा वापर करावा. बीआरटीएस बससेवा सुरू झाल्यानंतर हिंजवडी, वाकडकडे जाणे सोयीचे होणार आहे. तसेच,  काळेवाडी, चिंचवडमधील मोहनगर, विद्यानगर, रामनगर, मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर, पुढे चिखली या भागात राहाणा-या सर्वसामान्य नागरिकांना या बससेवेचा लाभ घेता येईल. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरात एकूण ४५ कि. मी. अंतरावर बीआरटीएस बससेवा पूर्ण होणार आहे. तरी, तातडीने हा बीआरटीएस मार्ग सुरू करण्यासाठी महानगरपालिका बीआरटीएस विभागाला सूचना द्याव्यात, असे अमित गोरखे यांनी निवेदनात म्हटले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button