breaking-newsराष्ट्रिय

काम न करता राहुल गांधींनी कोट्यवधींची संपत्ती कशी कमावली, भाजपाचा सवाल

भाजपाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचा गंभीर आरोप केला आहे. २००४ मध्ये राहुल गांधी यांना आपल्या नामांकन अर्जात ५५ लाख रूपये संपत्ती सांगितली होती. २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन ती ९ कोटी रूपयांची कशी झाली ? इतकी मोठी वाढ कशी झाली, त्यांच्या कमाईचे एकमेव साधन म्हणजे ते खासदार आहेत. ते डॉक्टर नाहीत किंवा वकिलासारखे व्यावसायिक नाहीत, असे भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे. जमीन व्यवहार, फार्म हाऊसपासून मिळणारे भाडे आणि एका संपत्तीच्या व्यवहाराबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित करताना काँग्रेस आणि राहुल गांधी यांना मानहानीचा खटला दाखल करण्याचे आव्हानही दिले आहे.

BJP

@BJP4India

राहुल गांधी ने इलेक्शन ऐफ़िडेविट में महरौली में ‘इंदिरा फ़ार्म हाउस’ की कीमत 9 लाख लिखी है लेकिन उससे आप करोड़ों किराया लेते हो : श्री @sambitswaraj

१,२६३ लोक याविषयी बोलत आहेत

दिल्लीतील महरोली येथील एका फार्म हाऊसवरुन संबित पात्रा यांनी आरोप केले आहेत. ते म्हणलो, ही सुमारे ५ एकर जमीन आहे. याची मालकी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याकडे आहे. इंदिरा फार्म हाऊस असे याचे नाव आहे. २०१३ मध्ये फायनान्शियल टेक्नॉलॉजी इंडिया लि. नावाच्या एका कंपनीला भाड्याने देण्यात आले होते. महिना ७ लाख रूपये भाड्याने हा फार्म हाऊस देण्यात आला होता. पहिल्यांदा यासाठी ४० लाख २० हजार रूपये आगाऊ घेण्यात आले. ही रक्कम व्याजमुक्त होती. या व्यवहारावरच पात्रा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आगाऊ रक्कम देऊन त्यावर व्याज ही न घेणे कसे शक्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

BJP

@BJP4India

हिंदुस्तान के राजनीति में राहुल गाँधी जी किस प्रकार के एसेट है वो सब जानते है और कई बार उनको ‘Non performing Asset’ के बारे में भी बताया गया है: श्री @sambitswaraj https://www.youtube.com/watch?v=9pfmzL1IH0Q 

५८२ लोक याविषयी बोलत आहेत

फार्म हाऊसच्या माध्यमातून २००७-०८ ते २०१२-१३ पर्यंत ३ कोटी रूपयांचे उत्पन्न घेतले. पण तिथे कोणी राहत नव्हते. तिथे दोघे भाऊ-बहिणीच राहत होते. राहुल गांधी यांनी आपल्या शपथपत्रात या फार्म हाऊसची किंमत ९ लाख रूपये सांगितली आहे. पण त्यांनी याच्या भाड्यातून कोट्यवधी रूपये कमावले, असा दावा पात्रा यांनी केला आहे.

गुरूग्राम येथील एका व्यवहाराबाबतही पात्रा यांनी गंभीर आरोप करताना म्हटले की, ऑक्टोबर २०१० मध्ये राहुल गांधींनी दोन व्यावसायिक मालमत्ता खरेदी केली होती. एकाची किंमत १.४४ कोटी आणि दुसऱी मालमत्ता ५.३६ कोटी रूपये आहे. ही खरेदी गुरूग्राममधील सिग्नेचर टॉवर्स-२ मध्ये करण्यात आली. याची मालकी यूनिटेककडे आहे. मालमत्ता ७ कोटींची आहे. पण करार फक्त ४ कोटींचा झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button