breaking-newsपिंपरी / चिंचवड

कस्पटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  • खासदार बारणे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना झाला सन्मान
  • डॉ. रामचंद्र देखणे यांनी दिले बहुमुल्य व्याख्यान

पिंपरी, (महाईन्यूज) – वाकड येथील कस्पटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत 38 जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी 300 हून अधिक ज्येष्ठ नागरिक सभासद उपस्थित होते.

  • वाकड येथील एका खासगी हॉटेलमध्ये हा कार्यक्रम मंगळवारी (दि. 28) घेण्यात आला. सोहळ्यात खासदार बारणे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामचंद्र देखणे, नगरसेवक संदीप कस्पटे, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक धनराज बीरड आदी यावेळी उपस्थित होते.

कस्पटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे 416 सभासद आहेत. त्यातील 75 वर्षे वयाचा टप्पा पूर्ण केलेल्या 31 जोडप्यांचा आणि 50 वर्षे वयाचा टप्पा पूर्ण केलेल्या 7 जोडप्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभासदांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी खासदार बारणे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. देखणे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनावर सुरेख व्याख्यान दिले.

  • कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष अदम कस्पटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष प्रकाश कुकडोळकर, सचिव राम लाभे, सहसचिव अदम देशमुख आदींनी केले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button