breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम आणखी आठ महिने चालणार

कर्वे रस्त्यावरील मेट्रोचे काम पुढील आठ महिने चालणार आहे. मेट्रोच्या कामामुळे कर्वेनगर परिसरात वाहतुकीची कोंडी मोठय़ा प्रमाणावर होत असतानाही महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपरेरेशनकडून एकतर्फी उपाययोजना होत असल्याबद्दल स्थानिक नगरसेवकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे वाहतूक कोंडीबाबत योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिले.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळे कर्वेनगर परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. या पाश्र्वभूमीवर कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, वाहतूक पोलीस आणि स्थानिक नगरसेवकांकडून काही उपाययोजना प्रस्तावित आहेत. या कामासंदर्भात समन्वय राखून मार्ग काढण्यासाठी महामेट्रोचे अधिकारी आणि अन्य संबंधित घटकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीला मेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, सह प्रकल्प संचालक प्रशांत कुलकर्णी, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, दीपक पोटे, जयंत भावे, राजा बराटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे यांची उपस्थिती होती. या वेळी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून एकतर्फी उपयाजोना केल्या जात असल्याबाबत नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

कामाच्या निमित्ताने रस्ता बंद करण्याची प्रक्रिया असो किंवा वाहतूक वळविण्याचा निर्णय असो, त्याबाबत नगरसेवकांना कळविले जात नाही.

रस्त्यावरील दुभाजक रंगविण्यात आलेले नाहीत. रेडियम पट्टय़ा तसेच दिशादर्शक फलक उभारण्यात आलेले नाहीत, अशी तक्रार खर्डेकर यांनी केली. तर सायंकाळी सहा ते रात्री नऊ या कालावधीत एकेरी वाहतूक सुरू असताना विधी महाविद्यालय रस्त्यावरून नळस्टॉप मार्गे पौड रस्त्यावर जाऊ इच्छिणाऱ्यांना थेट पौडफाटा उड्डाणपुलावर प्रवेश द्यावा, अशी मागणी जयंत भावे यांनी केली.

कर्वे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होत असताना कर्वे पुतळ्याकडून पौड फाटय़ाकडे येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढत असल्याची बाबही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. नगरसेवकांनी केलेल्या सूचनांवर  सकारात्मक निर्णय घेण्यात येईल आणि पुढील आठवडाभरात त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्रारंभ होईल, असे आश्वासन वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिकेचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button