breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या विजयाने पिंपरीत भाजपचा जल्लाेष

पिंपरी- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (मंगळवारी) पेढे वाटून, ढोल वाजवून जल्लोष साजरा केला.

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भाजपाला मिळालेले भरघोस यश मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. कर्नाटक निवडणुकीकडे 2019 मध्ये होणा-या लोकसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून पहिले जात आहे. या पूर्वतयारीमध्ये भाजप पास झाल्याच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. भाजपच्या या यशाचा आनंदोत्सव पिंपरीतही पक्षाच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, शहर प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोइर, अनुराधा गोरखे, राजेश पिल्ले, राजेंद्र गावडे, सीमा चौगले, वैशाली खाड्ये, संजीवनी पांडे, बिभिषण चौधरी, प्रदीप बेंन्द्रे, पूजा वायचळ, विजय शिनकर, आशा काळे, गणेश लंगोटे, पद्मनाभ शेट्टी, विठ्ठ्ल भोइर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले भरघोस यश हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्यांचा असलेल्या विश्‍वासामुळे मिळाला आहे. मोदींचे विकासकारण देशाला समोर नेऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button