breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटक विधानसभा निवडणूक : निकालापूर्वी कॉंग्रेसचे ‘होम हवन’

बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे कल हाती येण्यास सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एआयसीसीच्या कार्यालयाबाहेर होम- हवन केलं. कार्यकर्त्यांची ही ‘हवन करेंगे’ भूमिका पक्षाला कितपत फायद्याची ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकिकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क देवाला साकडं घातलं आहे, तर दुसरीकडे जेडीएसच्या एचडी कुमारस्वामी यांनीही मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी नागमंडला येथील एका मठाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील काही कार्यकर्त्यांची उपस्थितीही पाहायला मिळाली.

दरम्यान, नेतेमंडळीनी उचललेलं हे पाऊल त्यांना कर्नाटक विधानसभेत कुठवर पोहोचवणार आणि कितपत फळणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button