breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकात भाजपाने ‘या’ १२ जागा गमावल्या

बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १०४ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार यंदाच्या निवडणुकीत १२ जागांवर भाजपा उमेदवारांचा अगदी थोड्या मतांच्या फरकाने पराभव झाला आहे.

मस्की मतदार संघात काँग्रेसचे प्रताप गौडा यांनी फक्त २१३ मतांच्या फरकाने विजय मिळवला. बदामीमध्ये भाजपा उमेदवार बी. श्रीरामलु यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले. गडगमध्ये भाजपाच्या अनिल मेनसिनाकाय यांचा काँग्रेसच्या एच.के.पाटील यांनी १८६८ मतांनी पराभव केला. हायरीकीरुरमध्ये बासावानगौडा पाटील यांनी भाजपाच्या उजनेश्वरा बानाकार यांच्यावर ५५५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. जामकाडी, येनकीमार्डी, मस्की, श्रीनगीरी, कुंडगोल, येल्लापूर, आथानी, बेल्लारी, विजयनगर या मतदार संघात भाजपा उमेदवार अत्यंत थोडक्या मतांच्या फरकाने पराभूत झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button